VIDEO : शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळणार, योग्य वेळी घेणार निर्णय, ऐका काय म्हणाल्या पंकजा मुंडे - नरेंद्र मोदी
मुंबई : मला मंत्रिपदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे स्पष्ट करतानाच जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना केले. कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, आपलं घर आपण का सोडायचं असे बोलतानाच ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्या दिवशी बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या.