महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वैतरणा नदी पत्रात उड्या मारत स्टंटबाजी करणाऱ्या अतिउत्साही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल - Vaitarna river

By

Published : Jul 25, 2021, 6:37 PM IST

पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी नद्यांना मोठा पूर आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पर्यटनक्षेत्र आणि वाहत्या पाण्यात जाण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील काही अतिउत्साही तरुण या मनाई आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वाडा तालुक्यातील तिळसेश्वर या पर्यटनस्थळी वैतरणा नदीत काही अतिउत्साही तरुण उंचावरून नदीच्या वाहत्या प्रवाहात उड्या मारून आपला जीव धोक्यात घालत असल्याचे पहावयास मिळत आहे. नदीपात्रात उड्यरू मारून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details