व्हिडिओ : मुंबई पोलिसांच्या मॉकड्रीलचा व्हिडिओ व्हायरल - mumbai police viral video
मुंबई - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यात दोन अतिरेकींना मुंबई पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र यासंदर्भात पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असून हे मॉकड्रील असून लोहमार्ग पोलिसांनी मुंबई पोलिसांबरोबर आपत्कालीन परिस्थितीसाठी केली होती. बोरीवली स्टेशन फलाट क्रमांक 03 वर विरार बाजूकडील बुकिंग काउंटर येथे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपआयुक्त पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई चव्हाण तसेच बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याकडून भास्कर पवार, पोलीस निरीक्षक कदम, 32 पोलीस, डॉग स्कॉड तसेच अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन, ॲम्बुलन्स घटनास्थळी हजर होते.