
शिर्डीतील शिवभक्त चिमुकलीनं सरकारला जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल - एका चिमूकलीचा सरकारला जाब विचारल्याचा व्हायरल
शिर्डी (अहमदनगर) - यंदा कोरोना महामारीचा फटका सर्व सणवारांना बसला आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी राज्य सरकारने नियमावली तयार करत गर्दी करु नये असे ठणकावून सांगीतले आहे. बाईक रॅली, मिरवणूका काढू नये असे नियमचं शिवभक्तांवर लादले आहेत. मात्र, सरकर एकीकडे गर्दी करु नका म्हणते तर दुसरीकडे नेत्याच्या सभासमांरभ आणि दौऱ्यात गर्दी पाहायला मिळते आहे. यावरचं एका चिमूकलींन सरकारला जाब विचारल्याचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.