महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर भाविकांची दर्शनासाठी गर्दी - पुणे गणपती फेस्टीव्हल

By

Published : Sep 19, 2021, 7:33 AM IST

पुण्याचं वैभव असलेल्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तसेच त्याचे दर्शन घेण्यासाठी आज पुणेकरांनी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाबाहेर गर्दी केली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संध्याकाळी पेठांमध्ये जाणारे रस्ते देखील बंद करण्यात येत आहेत. तसेच विना मास्क, टवाळ खोरी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई देखील करत आहेत. मानाचे गणपती तसेच प्रमुख गणेश मंडळांकडून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता बाप्पाचे दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून घ्यावं, असं आवाहन या मंडळांच्यावतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details