विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून अर्थसंकल्पाचे स्वागत - Union Budget for Maharashtra
नागपूर - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वर्ष 2021-22 करिता अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला, अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याच प्रमाणे उद्योग जगत देखील बजेटकडे लक्ष लावून बसलेला होता. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था संकटात आली असल्याने यावेळी फारसं काही पदरात पडेल, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्राला नव्हती, मात्र कोरोना सेस किंवा टॅक्सच्या नावावर आणखी एक कर लादला जाईल, अशी भीती देखील उद्योजकांच्या मनात होती. मात्र अर्थमंत्र्यांनी कोणताही नवा कर प्रस्तावित केला नाही. याचे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने हा बजेट महत्वाचा ठरणारा आहे, असे देखील मत उद्योजकांनी व्यक्त केले. महत्वाचे म्हणजे बजेटवर नितीन गडकरी यांनी छाप असल्याचे ते म्हणाले आहेत...
Last Updated : Feb 1, 2021, 5:11 PM IST