Video : समुद्र, पर्वत, झाडे-वेली याप्रमाणे दीदींचा स्वरही अजरामर - लता मंगेशकर अंत्ययात्रा
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कॅण्डी रूग्णालयात निधन झाले. आधी कोरोना आणि नंतर न्यूमोनियाची लागण झाल्याने गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर कालची रात्र संपताच आज सकाळी पाऊने दहाच्या वाजताच्या सुमारास दीदींनी अखेरचा श्वास घेतला आणि असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली.