धन्वंतरी जयंती : 16 वनस्पतींचा वापर आरोग्यास फायदेशीर - वैद्य विक्रांत जाधव - 16 plants beneficial for health
नाशिक - दिवाळीला धनतेरस या दिवसापासून सुरुवात होते. हा दिवस सर्वत्र धन्वंतरी या देवतेची जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरींना आरोग्याची देवता संबोधले जाते. भारतीय चिकित्सा हा दिवस अत्यंत भक्तिभावाने साजरा करत भगवान धन्वंतरीचे मनोभावे पूजा अर्चा करतात. आरोग्य हीच धनसंपदा आहे हेच यातून संदेश दिला जातो. कोरोनाकाळात नागरिकांना आयुर्वेदाचे महत्व पटले आहे. धन्वंतरीने मानवाला 16 अशा वनस्पती दिल्या आहेत, ज्याचा आपण जिवाणू, विषाणूसाठी नव्हे तर काय स्वरूपी वापर केल्यास आरोग्याचे प्रश्न उद्भवणार नाही, असे मत नाशिकचे प्रसिद्ध वैद्य डॉक्टर विक्रांत जाधव यांनी मांडले आहे.