लहान मुलांसह वृद्धांसोबत उर्मिला मातोंडकरने साजरा केला वाढदिवस - ऊर्मिला मातोडकर यांचा वाढदिवस
मुंबई - विलेपार्लेमध्ये आज शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी त्यांचा वाढदिवस लहान मुलांसह वयस्कर महिलांसोबत साजरा केला. या वेळी उर्मिला मातोंडकर यांनी लहान मुलांना गाणे गाऊन दाखवले. बॉलिवूडची रंगीला गर्ल अर्थात उर्मिला मातोंडकरचा आज ४७वा वाढदिवस आहे. ४ फेब्रुवारी १९७४ ला मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. २०१४ मध्ये 'आजोबा' सिनेमात तिने अखेरचं काम केलं होतं.