जागतिक योग दिन : जालन्यात अप्पर पोलीस अधीक्षकांचा नृत्य योगा - jalna yoga day celebration
जालना - जागतिक आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून योग भूमी परिवाराच्या वतीने विशेष प्राणायाम योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज (सोमवारी) पहाटे पार पडलेल्या या शिबिरामध्ये प्रभारी पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीही सहभाग घेतला. प्राणायाम आणि योगासने झाल्यानंतर विविध गाण्यांच्या तालावर विक्रांत देशमुख यांनीदेखील नृत्य केले. कोरोनाची परिस्थिती असतानाही सामाजिक अंतराचे भान ठेवत आज हा योगा दिन पाळण्यात आला.