भारूड, गौळण, अभंग, ओव्या...आषाढीनिमित्त जाणून घ्या वारीचं वेगळेपण
चला जाऊ, पाहू डोळा, असं संत तुकोबांनी वारीविषयी म्हटलंय तर, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, असं माऊलींनी म्हटलंय...नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची, अशा शब्दांत संत नामदेवांनी वारीचा महिमा वर्णन केलाय, असं वारीवरील साहित्य अमापच. यातीलच काही संत साहित्याचे प्रकार आज जाणून घेऊयात.