VIDEO: पुण्यात शिवसेनेचे खड्डयांविरोधात अनोखे आंदोलन - शिवसेना आंदोलन पुणे
पुणे - मेट्रोचे काम सध्या शहरात सुरू आहे. मात्र या कामामुळे रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. जागोजागी खड्डे असल्यामुळे पुणेकरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्डयांमुळे पुणेकरांना मणक्यांचा त्रास होत आहे, असे सांगत पुणे प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने पुणेकरांना मणक्याच्या विमा काढून देत अनोखे आंदोलन केले आहे. शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.