VIDEO : उध्दव ठाकरेंना पुन्हा ऑफर, त्यांनी आमच्या गठबंधनात यावं - आठवले - रायगड न्यूज
खालापूर/रायगड : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे खोपोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे व त्या परिसरात सुशोभिकरण करणे या कामाचा लोकार्पण सोहळ्याला आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कवितेच्या शैलीतून भावना व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे याचे संबंध खूप चांगले होते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माझे संबंध का? बिघडले असे मत व्यक्त केले. तर माननीय उध्दवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित आमच्याबरोबर असेत तर ती संधी मिळाली नसती. तिकडे गेल्यामुळे मुख्यमंत्री झाले. परंतु आमची आताही त्यांना ऑफर आहे. अडीच-अडीच वर्षाला आम्ही तयार आहोत. ती चर्चा चालू आहे, असे आठवले म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आघाडीत बिघाडी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच, भविष्यात भाजपा-शिवसेना-आरपीआय एकत्र येऊ शकतात. जसं की, शिवसेना - राष्ट्रवादी - कॉग्रेस एकत्र आलेत. बाळासाहेबचं स्वप्न साकार करण्यासाठी उध्दव ठाकरेंनी गठबंधनात एकत्र येणं गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले.