VIDEO : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी धरला पारंपारिक आदिवासी नृत्यावर ठेका - जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भारती पवार यांचा नाच
पालघर - जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना मनोर येथे आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्रांच्या स्वागतासाठी 'गौरी नाच' हे लोकनृत्य सादर केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होत नृत्य केले. तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार मनीषा चौधरी यांनी या लोकनृत्यामध्ये सहभाग घेत नृत्यावर त्यांनी ठेका धरला.