महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Union Budget 2022 - यंदाचे अर्थसंकल्प निराशाजनक - ऋता चितळे - union budget session 2022

By

Published : Feb 8, 2022, 2:52 PM IST

पुणे - भविष्याचा विचार करुन यंदाचा अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) सादर करण्यात आला आहे. भविष्यात योजना येतील त्याचा उपभोग घेतला जाईल पण, आजचा मानूस जगल्यानंतरच. कोरोनामुळे कर भरणा चुकले असेल तर ते कर भरण्याबाबत सवलती दिल्या आहेत. एखाद्याला दोन महिन्याचा उशीर झाला तर दोन महिन्यानंतरही करदाते कर भरू शकतात. पण, त्यासाठीचा दंड तर भरावाच लागणार आहे. ज्यावेळी या सरकारने जीएसटी लागू केले. त्यावेळी वन नेशन वन टॅक्स, अशी घोषण्या देण्यात आली होती. मात्र, असे होताना अजूनही कोठे दिसत नाही, विविध प्रकारचे लहान-मोठे कर वसूल केले जातच आहेत. यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा निराशाजनक असल्याचे मत पुणे सीए असोसिएशनच्या उपाध्यक्ष ऋता चितळे यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details