अर्थसंकल्पाचे उद्योग जगताकडून स्वागत, पुण्यातील मराठा चेंबर्समधील तज्ञांच्या प्रतिक्रिया - fm nirmala sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्पातील काही बाबी सोडल्या तर स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रात उमटत आहेत. पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर तर्फे अर्थसंकल्पावर विश्लेषण करण्यात आले विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी, सरकारने या अर्थसंकल्पात प्रत्ये क्षेत्राचा चांगला विचार केला असून, उद्योग जगतासाठी चांगले बजेट असल्याचे म्हटले आहे.