तुम्ही माझं काहीही करू शकत नाही - नारायण राणे - Mumbai district news
मुंबई - तुम्ही कुणीही माझे काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझाही वाटा आहे. तेव्हा यापैकी कुणी नव्हते. ज्यांनी अपशब्द वापरले तेही तेव्हा नव्हते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तुम्ही सर्वांनी अनिल परब यांची कॅसेट पाहिली असेल. अधिकाऱ्यांना आदेश देता, पकडा त्याला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य कुठे आहे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहा त्यांच्या पत्रकार परिषदेचा 'अनकट व्हिडिओ'....