सत्तेच्या पदावर बसणारा पहिला ठाकरे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान - राष्ट्रवादी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. कधीही सत्तेच्या खुर्चीत बसणार नाही अशी शपथ बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. पण उद्धव यांनी हा नियम मोडला आहे. त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. मात्र ते थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत जाऊन बसणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेच्या भवितव्याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या. पण, उद्धव यांनी पक्षाची धुरा समर्थपणे पेलली. आज ते शिवसेनेला सत्तेच्या तख्तापर्यंत घेऊन गेले आहेत.