सीसीटीव्ही : कल्याण रेल्वे स्थानकात तरुणाची चाकूने वार करून हत्या - two people killed one kalyan railway station
कल्याण (ठाणे) - कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील बाकड्यावर सकाळच्या सुमारास झोपलेल्या एका तरुणावर अचानक दोन तरुणांनी हल्ला केला. त्यामधील एका आरोपीने चाकूने हल्ला केल्याने या हल्ल्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नारायण, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन संतोष राठोड यास अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण घटना प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Last Updated : Jul 6, 2021, 10:24 PM IST