दुचाकीचे इंजिन वापरून तयार केली रुबाबदार 'व्हिंटेज कार' - दुचाकीपासून बनवली व्हिंटेज कार
अहमदनगर जिल्ह्यातील निंभारी (ता. नेवासा) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील जनार्दन पवार यांची युवराज आणि प्रताप ही दोन मुले नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात पटाईत आहेत. लहानपणापासूनच नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्याकडे त्यांचा कल आहे. शेतीसाठी लागणारी औजारे त्यांनी तयार केली आहेत. लॉकडाऊनच्या काळात काहीतरी वेगळे करण्याचे ठरवत त्यांनी जुन्या पल्सर गाडीचा उपयोग करून एक रुबाबदार कार तयार केली आहे.