मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई.. 16 लाखांच्या एमडी ड्रग्ज पावडरसह दोन जण गजाआड - एमडी ड्रग्ज
ड्रग्सचा जीवघेणा धंदा करणाऱ्यां विरोधात मुंब्रा पोलिसांनी चांगलीच मोहीम उघडली आहे. ज्यात दोन आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून २१० ग्राम एमडी नावाचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या एमडीची बाजारात तब्बल १६ लाख एवढी किंमत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली. एन.डी.पी.एस पथकातील PSI काळे याना खबऱ्याने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे मुंबा बायपास रोडवर सापळा रचून गोडविन इमानियल इफेनजी या ४१ वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पाच लाख रुपये किमतीची १०० ग्राम एमडी पावडर सापडली. दुसरी अंमली पदार्थाची कारवाई २० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ज्यात पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोड एक मोफेडीन (एम.डी.) पावडरसह विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येत आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नदीम मेहबुब खान (वय ४० वर्षे, रा. गुप्ता पॅलेस, मुंब्रा जि.ठाणे) याला जेरबंद केले व त्याच्याकडून १० लाख रुपयांची ११० ग्राम मोफेड्रोन एमडी पावडर हस्तगत केली. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून सदर अमली पदार्थ त्यांनी कुठून मिळवले व ते कोणाला विकणार होते याचा पोलीस करत आहेत.