मनपाची प्रशासकीय इमारत सील करता येणार नाही - आयुक्त तुकाराम मुंढे - तुकाराम मुंढे नागपूर मनपा इमारत सील
नागपूर - महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात काम करणाऱ्या १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. महानगरपालिकेच्या इमारतीतच फायर स्टेशन आहे. त्यामुळे मनपाची प्रशासकीय इमारत सील करणार का? अशी चर्चा होती. इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करताना कार्यालय सील करणे शक्य होणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. ते सर्व कर्मचारी निगेटिव्ह आले असून सध्या ते विलागीकरण करण्यात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.