बंदी घातली तरी शिर्डीला जाणारच, तृप्ती देसाईंचा निर्णय - pune latest news
पुणे - शिर्डी (जि. अहमदनगर) येथील साईबाबा देवस्थान परिसरात पोशाख संबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी (दि. 10 डिसें.) सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना होणार आहेत. बंदी असली तरी शिर्डीला जाणारच देसाईंचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सातारा रोडवर धनकवडी येथे असलेल्या निवासस्थानातून त्या गुरुवारी सकाळी शिर्डीला जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.