थरारक VIDEO : मुंबई-नाशिक महामार्गावर तिहेरी अपघात; भरधाव कंटेनर, कार व दुचाकी एकमेकांना धडकले - thane accident news
ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर, कार व दुचाकीमध्ये भीषण तिहेरी अपघात झाल्याची ( Triple accident on Mumbai Nashik highway ) घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे अपघातग्रस्त कंटेनर विद्युत पोलला धकडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. या भीषण अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर अपघाताची नोंद वाशिंद पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.