निसर्ग चक्रीवादळ : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, झाडे उन्मळून पडली - निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीत परिणाम
रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे रत्नागिरीतील समुद्र खवळलेला आहे. उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. तसेच मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाला. तसेच वाऱ्याचा वेग देखील जास्त आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.