मराठा आरक्षण : 'आंदोलकांच्या मागण्यांवर राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल' - मराठा आरक्षण आंदोलन
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी काल (शनिवार) मुख्यमंत्री निवसास्थान मोतोश्रीवर मशाल मोर्चा काढला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आरक्षण प्रश्न महत्त्वाचा असून राज्य सरकार लवकरात लवकर यावर निर्णय घेईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.