...अखेर अक्षय्य तृतीयेला भेंडवळची भविष्यवाणी झालीच, ऐका काय आहे 'विशेष' - भेंडवळ
बुलडाणा - कोरोना संसर्गामुळे जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सारंगधर महाराज वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पहाटे घट मांडणीचे भाकीत वर्तविले. राजा कायम राहील मात्र, रोगराईच्या संकटामुळे राजावर तणाव येईल, असे भाकीत या मांडणीतून वर्तवण्यात आले. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरु केली होती.