अमरावती : भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर दुभाजकावर आदळला; घटना सीसीटीव्हीत कैद - अमरावती ट्रॅक्टर अपघात बातमी
अमरावती - मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रोडवर भरधाव वेगात येणारा ट्रॅक्टर दुभाजकावर जाऊन आदळला आहे. भरदिवसा ही घटना घडली असून हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक मात्र गंभीर जखमी झाला आहे.