पुण्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; इमारतींच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी - pune weather update
पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. आज (शनिवारी) संध्याकाळी शहराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला असून धानोरीमध्ये काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर धानोरीच्या संकल्प नागरीच्या सखल भागात पाणी साचले होते. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशता ढगाळ राहून मेघगर्जना व विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.