VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'शेंगदाणे-खोबऱ्याचे मोदक' - शेंगदाणे आणि नारळाचे मोदक
मोदक हा लाडक्या गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याचे मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. शेंगदाणे पोषक असतात. शेंगदाणे आणि नारळाचे सारण असलेले आरोग्यासाठीही गुणकारी असतात. शेंगदाण्याची चवदार चव, गूळ आणि नारळाची गोड चव हे मोदक अधिक अप्रतिम बनवतात. ही मोदक रेसिपी वापरून पहा आणि तुम्हाला ती किती आवडली ते आम्हाला नक्की कळवा.