चंद्रपूर : झुडपात लपलेल्या वाघाचा तरुणावर हल्ला; मालेवाडा येथील घटना
चिमूर - चिमूर कान्पा मार्गावरील मालेवाडा येथील सुगतकुटी जवळील झुडपी जंगलात वाघ असल्याचे पहाटे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती गावात व परीसरात पोहचल्याने वाघाला पाहायला गर्दी झाली. यात मालेवाडा येथील मोरेश्वर चौधरी (३५) हा वाघ लपून असलेल्या जागेकडे गेल्याने वाघाने पंजाचा तडाखा देत त्याला जखमी केले.