VIDEO : चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या व्यक्तीचे तिकीट परीक्षकांनी वाचवले प्राण - Dadar Railway Station
मुंबई - दादर स्टेशनवर कर्तव्यावर असताना नागेंद्र मिश्रा या वरिष्ठ तिकीट परीक्षकांना चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत एक प्रवासी पडताना दिसला. मिश्रा वेगाने पुढे सरकले आणि त्याने पडणाऱ्या तरुणाला ओढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. नागेंद्र मिश्रा यांची समजूतदारपणा, धाडस आणि तत्काळ कारवाईमुळे रुळावर पडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.