जागतिक मैत्री दिन; वीजवितरण कंपनीचे पृथ्वीराज तारापुरेचा गायनाचा छंद! - जागतिक मैत्री दिनाबद्दल बातमी
नांदेड - क्षेत्र कुठलेही असो, आपले काम करत असताना छंद जोपासण्याचे काम व्यक्ती सोडत नाही. त्यातच गायनाचा छंद म्हटले, की अलीकडच्या काळात चांगलाच वाव मिळत असल्यामुळे अनेकांचे व्हिडिओ समाजमाध्यमावर पाहायला मिळत आहेत. पोलीस खात्यापाठोपाठ आता वीजवितरण विभागही मागे नाही. वीजवितरण विभागात वरीष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले पृथ्वीराज तारापुरे यांनीही आपले कर्तव्य बजावत गायनाचा छंद जोपासला आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारत ने संवाद साधला.