मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू - मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात
रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. 1 जूलै (आज) रोजी सायंकाळच्या सुमारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले आहे. तर मृतकामध्ये एका लहान मुलाचा समावेश असल्याचे माहिती बचाव कार्य करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. वाहतूकीला अडथळा होऊन नये म्हणून बोरघाट पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्त टिमने तत्काळ उपाययोजना राबवून वाहतूक सुरळीत केली असून जखमींना एम.जी.एम. रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.