मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; एकाचवेळी 7 ते 8 वाहनं धडकली - Bijasan Ghat
धुळे - मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी एकाचवेळी धडक दिली. बिजासण घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर काही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेत चारचाकींचा वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील दाखल होत मदतकार्य सुरु आहे.