कोल्हापुरातील तरुणांनी बनवले 'बिस्कीट कप'! - कोल्हापूर पर्यावरणपुरक बिस्कीट कप न्यूज
कोल्हापूर - चहा आणि कॉफी पिल्यानंतर अनेक ठिकाणी सध्या प्लास्टिक व कागदी कप फेकलेले पाहायला मिळतात. हा कचरा टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक किंवा कागदी कप ऐवजी 'बिस्कीट कप' हा नवीन पर्याय समोर आला आहे. कोल्हापूर शहरातील तीन तरुणांनी मिळून हा पर्याय शोधला असून या कपचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा घेत आहेत. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. इतर राज्यात काही ठिकाणी सध्या या कपची किंमत 7 ते 8 रुपयांपर्यंत आहे. मात्र, कोल्हापुरातील या तरुणांनी बिस्कीट कपची किंमत केवळ 3 रुपये इतकी ठेवली आहे. शिवाय लवकरच खाण्यायोग्य प्लेट आणि बाऊलसुद्धा बनवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.