गणपती बाप्पा मोरया : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' बनवा 'ड्राय फ्रूट' मोदक - सुका मेवा मोदक
लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन आज सर्वत्र जल्लोषात होत आहे. मोदक हा गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आम्ही तुम्हाला रोज नवीन मोदक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. आज सुक्या मेव्यापासून बाप्पासाठी मोदक बनवूया. आपल्या प्रियजनांना निरोगी आणि मनोरंजक वाटण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे (सुका मेवा) मोदक बनवा. भारतात सण आणि मिठाई समानार्थी आहेत. त्यामुळे आज घरी ड्राय फ्रूट मोदक करून पहा. गणरायाला, आप्तजणांना खायाला द्या आणि निरोगी राहा.