Liquor Store Theft Amaravati : पीपीई किट घालून चोरट्याने दारूच्या दुकानात केली चोरी.. - पीपीई किट घालून चोरी
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील कुसमकोट येथे देशी दारूच्या दुकानात चोरी करण्यासाठी एका चोरट्याने चक्क पीपीई किट घातल्याच समोर आलं ( Liquor Store Theft Amaravati ) आहे. या चोरट्याने पीपीई किट घालून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून व आतील कडी तोडत दुकानात प्रवेश केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं ( Liquor Store Theft Wearing PPE Kit ) आहे. चोरट्याने दुकानातील सत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथे हे दारूचे दुकान आहे. तीस तारखेला मध्यरात्री हा चोरटा दारूच्या दुकानात पैसे चोरण्याच्या उद्देशाने शिरला होता. चोरी करत असताना आपली ओळख पटू नये म्हणून या चोरट्याने पीपीई किट घातली होती. दरम्यान पोलिसांनी आता सीसीटीव्ही व्हिडिओ ताब्यात घेतले असून, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीला शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.