अखेर रंगभूमी सांगलीतील नाट्यगृहाचे दार उघडले - बालगंधर्व नाट्यगृह
रंगभूमी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीतील नाट्यगृहांचे पडदे आजपासून उघडले आहेत. तब्बल 18 महिन्यांच्या कालावधीनंतर नाट्य रंगमंच खुले झाले आहेत. सांगलीमध्ये अखिल भारतीय नाट्य मंदिर समितीच्यावतीने विष्णुदास भावे नाट्य मंदिर आणि मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात नटराज मूर्ती पूजन आणि तिसरी घंटा वाजवून पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी व नवोदित कलाकार उपस्थित होते.