'टू-प्लस' अभियानातून जिल्हा पोलिसांनाची तब्बल अडीच हजार गुन्हेगारांवर नजर - ahmednagar breaking news
अहमदनगर - जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेअंतर्गत पोलिसांनी 2 हजार 640 गुन्हेगारांची यादी अद्ययावत केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे घेऊन त्यांचे प्रबोधन करतानाच पुन्हा गुन्हे कराल तर खैर नाही, अशी तंबीही दिली जात आहे. राज्यातील हे पथदर्शी अभियान असणार आहे.