VIDEO : ट्रॅक्टर चालकास दिसला बिबट्या; मंठा परिसरात भीतीचे वातावरण - बिबट्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद
जालना - जालन्यातील मंठा तालुक्यात एका ट्रॅक्टर चालकाला बिबट्या आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मंठा तालुक्यातील हातवन-परतूर येथील श्रीधर जवळा भागात हा बिबट्या आढळून आला. ट्रॅक्टर चालक सुनील काळे हे ट्रॅक्टर चालवत असताना अचानक लाईट समोर बिबट्या दिसला. त्यांनी या बिबट्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने मंठा तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.