VIDEO : जगभरातील संत साहित्यांचा अभ्यासक्रम आता पैठण संतपिठातून शिकवला जाणार - मराठवाडा विद्यापीठ कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
औरंगाबाद : जगभरातील संत साहित्याचा अभ्यासक्रम आता 17 सप्टेंबरपासून पैठणच्या संतपिठातून शिकवला जाणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते याचे अनावरण झाले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी याची माहिती दिली. तब्बल 21 वर्षानंतर पैठणच्या संतपिठातून संत साहित्यांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. संतपिठाच्या माध्यमातून जीवनासाठीची आवश्यक मानवी मुल्ये याचे शिक्षण, संशोधन कार्य राबविण्यात येईल, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटले. अभ्यास मंडळ स्थापन करुन येत्या 17 सप्टेंबरपासून अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील, असेही त्यांनी घोषित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या संचलित संत एकनाथ महाराज संतपीठ सुरु करण्यासंदर्भात रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी संतपीठ इमारतीची पाहणी केली.