मुंबईच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कायम; अंतर्गत वाहतूक मंदावली - Mumbai
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे .राज्यात कोरोनाग्रस्तांची 60 वर गेली आहे. राज्य सरकार हा आकडा वाढू नये, यासाठी कडक उपाय योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आज सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या रेल्वे आणि बसमधील प्रवाशांची संख्या घटली होती. तर दुसरीकडे मुंबईचे मुख्य रस्ते असणाऱ्या पश्चिम आणि पूर्व दृतगती महामार्गावर जास्त परिणाम दिसून आला नाही. खासगी वाहने मोठ्या संख्येने धावत होते. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या मोठी होती. मात्र, जे अंतर्गत रस्ते आहेत. तिथे वाहतूक मंदावल्याचे चित्र होते. रविवार (दि. 22 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. त्यामुळे उद्याची काय स्थिती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.