तौक्ते वादळात मृत्यूच्या दाढेतून आलेल्या बार्जमधील कर्मचाऱ्यांनी सांगितला 'हा' थरारक अनुभव - तौक्ते चक्रीवादळ बातमी
मुंबई तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील एकूण 188 जणांना बुधवारी (दि. 19 मे)वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 37 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत. नेमके काय घडले होते पी 305 बार्जवर, बचाव कार्यावेळी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, चक्रीवादळाची पूर्व सूचना मिळाली होती की नाही, कसा होता तो थरार, याबाबत बार्जवरील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केला आहे.