यवतमाळच्या 'या' शिल्पकाराने बनवले महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शिल्प - यवतमाळ जिल्हा बातमी
यवतमाळ - राजधानी दिल्लीत येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या पथसंचलनात महाष्ट्रातील संतांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्ररथावरील महाराष्ट्रातील संतांची शिल्पे ही यवतमाळच्या मातीत बनली आहेत. ही यवतमाळ जिल्हासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. दारव्हा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात नखेगाव येथे राहत असलेल्या प्रवीण पिल्लारे, असे या शिल्पकाराचे आहे.