कोल्हापूरात वीज कोसळतानाचे दृश्य कॅमेरात कैद - कोल्हापूर हवामान वार्ता
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात काल मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस झाला. यावेळी कोल्हापूरात विविध ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूर शहरात सुद्धा एका ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळल्याची घटना घडली असून अंगावर काटा आणणारे हे दृश्य काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केले. कोल्हापूर शहरातील प्रतिभानगर परिसरात ही वीज कोसळली तर पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावात सुद्धा एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले.