VIDEO - महाडमध्ये पूरस्थिती कायम, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली - रायगड पाऊस अपडेट्स
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अंबा, सावित्री, नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, पाली, खोपोली रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाली येथील पाणी ओसरले असले तरी महाडमध्ये रात्रीपासून पाऊस जोरदार पडत आहे. त्यामुळे पुन्हा महाड बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. नागरिकांनी पाणी वाढत असल्याने रात्र जागून काढली आहे. इतर भागात पाऊस थांबला असला तरी महाडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत.