पोलिस दलात आता 13 फूट लांबीचे बॅरिकेट्स - मुंबई पोलीस अपडेट, लेटेस्ट
मुंबई - लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिसांमार्फत जागोजागी नाकाबंदी केली जाते. आता या नाकाबंदीमध्ये पोलीस खात्यात स्लायडिंगच्या बॅरिकेट्स चा समावेश झाला आहे. सरकार ग्रुप तर्फे हे बॅरिकेट्स पोलिसांना दिले जात आहे. यापूर्वी छोटे बॅरिकेट्स असत. मात्र, हे नवे बॅरिकेट्स तेरा फुटापर्यंत रस्ता बंद करत असल्याने पोलीस दलाला याची मदत होणार आहे. सरकार ग्रुपतर्फे मुंबई पोलीस दलाला आतापर्यंत 100 बॅरिकेट्स देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाच्या काळात जवळपास 200 पेक्षा अधिक ठिकाणी नाका-बंदी सुरु आहे. कोरोनामुळे अनेक पोलीस कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे नाका-बंदी दरम्यान या बॅरिकेट्सची मदत होईल असे सरकार ग्रुपच्या संचालक सिमरन सांगत आहेत. तसेच बांद्रा डिवीजन चे एसीपी दत्ता भरगुडे म्हणाले की, या बॅरिकेट्समुळे खूप मदत होणार आहे. मंदीच्या काळात हे बॅरिकेट्स तेरा फुटापर्यंत लांब होतात. जवळपास दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे काम हे बॅरिकेट्स करू शकतात.