जन्मदाती आईच उठली मुलीच्या जीवावर - virar crime news
पालघर/विरार - विरारमध्ये एका जन्मदात्या आईनेच दोन वर्षांच्या पोटच्या मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून आरोपी आईला अटक केली आहे.विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील पारिजात अपार्टमेंट या इमारतीमध्ये सहामहिन्यापूर्वी सोनुकूमार सोनी हा रिक्षाचालक पत्नी नेहा आणि नानसी मुलीसोबत राहत होता.या आई मुलीला बेदम मारहाण करत होती. शनिवारी अशाच केलेल्या मारहाणीत नानसी या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. आपली मुलगी बेशुद्ध झाल्याने तिला उपचारासाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तेव्हा, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासाअंती आईने केलेल्या बेदम मारहाणीत नानसीचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मुलीला अनेक महिन्यापासून घरात मारहाण केली जात असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.