गोरेगावमध्ये क्राईम ब्रँचचा छापा; 34 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त - गोरेगाव रेमडेसिवीर काळाबाजार बातमी
मुंबई - सध्या कोरोना उपचारासाठी मोठा प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी होत आहे. याचाच फायदा घेऊन काहीजण या इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. याविरोधात क्राईम ब्रँच युनिट-12ने एक मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव पश्चिमेमधील मोतीलाल नगरमध्ये लिंक रोडजवळ असलेला एका हॉटेलच्या किचनमध्ये छापा मारून तब्बल 34 इंजेक्शन जप्त केले आहेत. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी गुजरातमधून रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईमध्ये आणून 20 ते 25 हजार रुपयांना विकत होते.